अस्सल कोल्हापुरी शाही पनीर रेसिपी मराठी (Shahi Paneer Recipe In Marathi)

शाही पनीर बनवा अगदी 30 मिनिटा मध्ये 

शाही पनीर आपण सहसा बाहेर हॉटेलमधून घरी काही कार्यक्रम असेल तर ऑर्डर करतो. पण तुम्हीही घरच्या कार्यक्रमासाठी घरच्या घरी शाही पनीर बनवू शकता. घरच्या शाही पनीरचा स्वाद काही वेगळाच आणि अप्रितम लागतो. 

 वाचा। https://storiesaboutvillage.blogspot.com/2023/04/storiesaboutvillage%20blogger.com.html

साहित्य 


  • 200 ग्रॅम चीज
  • 2 मोठे टोमॅटो प्युरी
  • 1 कांदा प्युरी
  • 1/2 वाटी काजू पेस्ट
  • 7-8 बदाम पेस्ट
  • 1/2 वाटी दही
  • 1/2 वाटी मलई क्रीम
  • 1 तेजपत्ता
  • 1 मोठे चक्रीफूल
  • 3 लवंग
  • 1 मोठी वेलची
  • 3 हिरवी वेलची
  • पाव चमचा शहाजिरे 
  • 1 इंच दालचिनीचा तुकडा
  • 4 मिरीचे दाणे 
  • 1 चमचा आले लसूण पेस्ट
  • 1 चमचा धणे पावडर
  • 1/2 चमचा मसाला
  • ½ चमचा हळद पावडर
  • 1 चमचा काश्मिरी लाल तिखट
  • चवीनुसार मीठ
  • 4 चमचे बटर / तूप
  • 1/2 कप दूध
  • 1 चमचा कसूरी मेथी
  • 1/2 चमचा साखर

              शाही पनीर 


कृतीः 

  1. पनीरचे चौकोनी तुकडे करून घ्या. कांदा, टोमॅटो, काजू आणि बदाम पेस्ट करून घ्यावी. दही घेऊन त्यात धणे पावडर टाकून चांगले मिक्स करून फेटून घ्या.
  2. एका पॅनमध्ये बटर आणि तेल घाला. त्यात पनीर सोनेरी रंग येईपर्यंत शॅलो फ्राय करून घ्या आणि काढून बाजूला ठेवा
  3. आता त्याच पॅनमध्ये, तेजपत्ता, वेलची, लवंग, शाहजिरे, मिरे, दालचिनी टाकून परतून घ्या आणि मग आता त्यात कांदा टाकून परतून घ्यावे. कांदा सोनेरी होऊ द्या
  4. त्यानंतर त्यात आले लसूण पेस्ट आणि काजू बदाम पेस्ट टाकून चांगले मिक्स करून घ्या. त्यानंतर चांगले परतल्यावर त्यात हळद पावडर आणि लाल तिखट टाकून एकत्र मिक्स करा. त्यात टोमॅटो प्युरी आणि मीठ घालून मिक्स करा आणि झाकण ठेवून शिजू द्या
  5. बाजूने तेल, बटर सुटल्यावर त्यात धणे पावडर मिश्रित दही टाकून चांगले मिक्स करून घ्या
  6. त्यावर झाकण ठेवून शिजू द्या. 3-4 मिनिटानंतर झाकण काढून त्यात मलई क्रीम घालून चांगले मिक्स करून घ्या.
  7. त्यावर तुम्हाला हवी असेल तर चिरलेली कोथिंबीर मिक्स करा. पुन्हा झाकण ठेवून शिजू द्या. आता त्यात दूध टाकून एकत्र करावे आणि एक उकळी येऊ द्यावी.
  8. आता त्यात कसुरी मेथी कुस्करून घाला. मसाला आणि साखर घालून मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात तळलेले पनीरचे तुकडे टाकून एकत्र करावे. शाही पनीर तयार आहे    

टीप :- अश्या पद्धतीने शाही पनीर तयार आहे तर अश्या पद्धतीने आमच्या या पेज वर जाऊन भरपूर रेसेपी आहेत पहा आणि आम्हला कमेंट करून सांगा