संजय गांधी निराधार पेन्शन अनुदान योजना संपूर्ण माहिती
नमस्कार मित्रांनो. आज आपण संजय गांधी निराधार पेन्शन योजनेची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. काय आहे हि संजय गांधी निराधार योजना, योजनेची उद्दिष्ट कोणती, लाभ कोण शकणार, लाभ किती असणार, त्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, अर्ज कुठे करायचा या सर्व प्रश्नाची उत्तरे तुम्हला आज या लेखात मिळणार आहेत. जर तुम्हीही निराधार आहेत किंवा तुमच्या जवळचा कोण निराधार आहे. तर नक्कीच तुम्ही त्यांना या योजनेबद्दल सांगून त्यांचे जीवन सुखकर बनऊ शकता. त्यासाठी संपूर्ण लेख नक्की वाचा.
राज्यातील निराधार, मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती, वृद्ध व्यक्ती. अंध, अत्याचारित महिला, अपंग, शारीरिक, विधवा, वेश्या व्यवसायातून मुक्त महिला, तसेच घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने संजय गांधी निराधार अनुदान योजना १९८० पासून राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यातील ६५ वर्षाखालील वयाच्या निराधार लोकांना मदत दिली जाईल. या योजनेचा लाभ घेऊ इच्छित इच्छुक लाभार्थी या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन योजनेचा फॉर्म मिळवू शकता. या योजनेंतर्गत गरीब महिला, अनाथ मुले व कोणत्याही आजाराने ग्रासलेल्या लोकांना मदत दिली जाईल.ही एक विशेष पेन्शन योजना आहे जी केवळ निराधारांना मदत करेल.
संजय गांधी निराधार योजनेची उद्दीष्टे कोणती?
या योजनेचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे गरीब लोकांना मदत करणे. निराधार लोकांना या योजनेतून मासिक पेन्शन मिळणार आहे. निराधार लोकांना आर्थिक सहाय्य करणे आणि त्यांचे जीवन अधिक सुखकर करणे हे या योजनेचे मुख्य उद्दीष्ट आहे. जेणेकरून ते त्यांचे आयुष्य आरामात जगू शकतील. या योजनेअंतर्गत दिल्या जाणाऱ्या पेन्शन च्या मदतीने राज्यातील निराधार लोकांना खूप मोठी मदत मिळणार आहे. राज्यातील निराधारांना आर्थिक पाठबळ संजय गांधी निराधार पेन्शन योजनेच्या रूपात मिळणार आहे. या योजनेंतर्गत सरकार निराधार लोकांना मासिक पेन्शन देईल. मासिक पेन्शनमुळे हे लोक त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवू शकतात.
संजय गांधी निराधार योजनाचे लाभार्थी कोण ?
६५ वर्षाखालील निराधार पुरुष व महिला
मानसिक आजाराने रोगग्रस्त व्यक्ती
वृद्ध व्यक्ती
अंध
विधवा
वेश्या व्यवसायातून मुक्त महिला
घटस्फोटीत महिला
निराधार पुरुष व महिला
अनाथ मुले
अपंगातील सर्व प्रवर्ग
कुष्ठरोग, क्षयरोग, कर्करोग, एड्स यासारख्या आजाराने पीडित महिला व पुरुष
निराधार विधवा ( आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या विधवासह )
घटस्फोट प्रक्रीयेतील व घटस्फोट झालेल्या परंतु पोटगी न मिळालेल्या
अत्याचारित महिला
तृतीयपंथी
देवदासी
३५ वर्षावरील अविवाहीत स्त्री
तुरूंगात शिक्षा भोगत असलेल्या कैद्यांची पत्नी
सिकलसेलग्रस्त
0 टिप्पण्या