होममेड पिझ्झा रेसिपी मराठीतून (Pizza Recipes In Marathi)

पिझ्झाचं नाव ऐकताच अथवा टिव्हीवर पिझ्झाची जाहिरात पाहतात तोंडाला अक्षरशः पाणी सुटतं. पिझ्झाचे विविध प्रकार बाजारात मिळतात. निरनिराळा बेस असलेले आणि निरनिराळ्या टॉपिंगचे पिझ्झा तुमचं मन वेधून घेतात. मात्र सध्या कोरोनाच्या काळात जर तुम्हाला बाजारातील पिझ्झा नको असेल तर तुम्ही घरच्या घरी स्वतःच्या हाताने विविध प्रकारचे पिझ्झा तयार करू शकता. यासाठी तुम्हाला फक्त पिझ्झा कसा करायचा हे माहीत असायला हवं. वास्तविक पिझ्झा घरच्या घरी तयार करणं अतिशय सोपं काम आहे. यासाठी जाणून घ्या या पिझ्झा रेसिपी मराठीतून (pizza recipe in marathi.)




ब्रेड पिझ्झा (Bread Pizza Recipe In Marathi)

पिझ्झा बनवण्याचा सर्वात सोपा आणि झटपट प्रकार म्हणजे ब्रेड पिझ्झा. यासाठी तुम्हाला पिझ्झा बेस विकत आणण्याची अथवा पिझ्झा बेस बनवण्याची गरज नाही. शिवाय प्रत्येकाच्या घरी नाश्तासाठी ब्रेड असतोच. त्यामुळे पिझ्झाचा हा प्रकार अतिशय सोपा आणि कधीही करण्यासारखा आहे. तेव्हा जाणून घ्या झटपट होणारी पिझ्झा रेसिपी मराठीतून.





साहित्य


ब्रेडचे स्लाईज अंदाजे चार

एक चमचा बटर

एक चिरलेला कांदा 

एक चिरलेला टोमॅटो

एक चिरलेली सिमला मिरची

बेबी कॉर्न

चिरलेले मशरूम

पिझ्झा सॉस

टोमॅटो सॉस

चमचा ऑरेगॅनो 

एक चमचा चिली फ्लेक्स

किसलेले मोझेरोला चीझ

चवीपुरतं मीठ

 पिझ्झा बनवण्याची कृती –

एका पॅनमध्ये थोड्या बटरवर कांदा, टॉमेटो आणि सिमला मिरची परतून घ्या. 

त्यामध्ये आवडत असेल या अंदाजाने पिझ्झा सॉस, ऑरगॅनो, चिली फ्लेक्स मिक्स करा आणि पॅनखालील गॅस बंद करा. 

वरून मीठ घालून मिश्रण मिक्स करा.

तव्यावर ब्रेडचे स्लाईज बटर लावून एकाबाजून शेकवा. 

दुसऱ्या बाजूने शेकत ठेवा आणि वरच्या  बाजून पिझ्झाचे मिश्रण अथवा टॉपिंग ब्रेडला लावा.

वरून मस्त हवं तेवढं मोझेरेला चीझ पेरा.

चीझ मेल्ट झालं की वरून ऑरॅगेनो, चिली फ्लेक्स आणि सॉस टाकून सर्व्ह करा.