पनीर पिझ्झा मराठी
पनीर पिझ्झा :- पनीर हा पदार्थ अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतो. शिवाय रोजच्या भाजी,स्नॅक्ससाठी लागत असल्यामुळे तो घरात नेहमीच असतो. पिझ्झा बेस विकत आणलेला असेल तर घरीच पिझ्झा करणं काहीच कठीण नाही. त्यामुळे मनसोक्त पनीर खाण्यासाठी ट्राय करा ही पिझ्झा रेसिपी मराठीतून
![]() |
साहित्य –
पिझ्झा बेस
एक चिरलेला कांदा
एक चिरलेला टॉमॅटो
एक चिरलेली सिमला मिरची
अर्धी वाटी पनीर
मोझेरेला चीझ
पिझ्झा सॉस
टोमॅटो सॉस
काळीमिरी पावडर
चिली फ्लेक्स
बटर
चवीपुरतं मीठ
पिझ्झा बनवण्याची कृती –
पिझ्झा बेसला बटर लावा.
त्यावर पिझ्झा सॉस आणि टॉमेटो सॉस पिझ्झा बेसला नीट लावा.
वरून टॉपिंगसाठी चिरलेला कांदा, चिरलेला टोमॅटो, सिमला मिरची, पनीर, चीझ लावून घ्या
तयार पिझ्झा बेस पाच मिनीटे ओव्हनमध्ये ठेवा.
ओव्हन नसेल तर झाकण असलेल्या पॅनमध्ये तुम्ही तो गरम करू शकता.
वरून सॉस, काळीमिरी, चिली फ्लॅक्स, मीठ टाकून सर्व्ह करा.
या पद्धतीने पनीर पिझ्झा तयार झाला आहे
टीप:- आमची ही पोस्ट आवडली असल्यास आम्हला फोल्लो करायला विसरू नका
0 टिप्पण्या