पिझ्झा रेसेपी चिकन पिझ्झा बनवा अगदी 10 मिनिटांत :-(Chicken Pizza Recipe In Marathi)

तुम्ही नॉन व्हेज खाणारे असाल तर तुमच्यासाठी नॉन व्हेज पिझ्झा (non veg pizza recipe in marathi) चा हा प्रकारही अतिशय उत्तम ठरेल. संडे स्पेशल हा पिझ्झा ट्राय करा आणि कुटुंबासोबत घरच्या घरी पार्टी करा.


चिकन पिझ्झा 


Red more व्हेज पिझ्झा

Red more होममेड पिझ्झा रेसिपी मराठीतून (Pizza Recipes In Marathi)

साहित्य

  • पिझ्झा बेस
  • पाव किलो बोनलेस चिकन
  • एक चमचा आले, लसूण, हिरवी मिरची पेस्ट
  • एक चमचा तंदुरी मसाला
  • चिरलेला कांदा
  • एक चमचा चिकन मसाला
  • चार ते पाच पानेपुदिना
  • अर्धी वाटी कोथिंबीर
  • एक हिरवी मिरची
  • चार पाकळ्या लसूण 
  • एक चमचा लिंबू साखर 
  • बटर
  • चीझ
  • टोमॅटो सॉस
  • मीठ चवीपुरते

चिकन पिझ्झा बनवण्याची कृती –

  1. चिकन स्वच्छ धुवून घ्या.
  2. त्याचे छोटे छोटे तुकडे करा..
  3. तेल गरम करून त्यात कांदा परतून घ्या.
  4. त्यात आलं, लसूण आणि मिरचीची पेस्ट टाका.
  5. तंदूर मसाला आणि चिकन मसाला, मीठ टाका.
  6. चिकनचे तुकडे परतून घ्या.
  7. अर्धा कप पाणी टाकून चिकन शिजू द्या.
  8. पुदिना, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, लिंबू साखर मीठ टाकून चटणी बनवा.
  9. पिझ्झा बेसवर बटर, सॉस, चटणी लावा.
  10. त्यावर चिकनचे तुकडे, चीझ लावून घ्या.
  11. पंधरा मिनीटे पिझ्झा गरम करा आणि सर्व्ह करा.
टीप :- नमस्कार मित्रांनो तुम्हाला ही रेसिपी आवडली असले तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि काही बदल हवा असेल तर तो ही संगा