सरकारी योजनाश्रावण बाळ योजना 2023 महाराष्ट्र माहिती मराठी | Shravan Bal Yojana 2023: लाभार्थी यादी, ऑनलाइन अर्ज
Shravan Bal Yojana 2023 Online Application, Beneficiary List, Application Status | श्रावण बाळ योजना कागदपत्र, योजना यादी, लाभार्थी लिस्ट, ऑनलाइन फॉर्म | श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना | श्रावण बाळ योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी | महाराष्ट्र सरकारी योजना 2023 |
Red more शरद पवार ग्रामसमृद्धी योजना माहिती | गाय गोठा अनुदान महाराष्ट्र
भारत देश हा एक विकासशील देश आहे, आणि कृषिप्रधान देश आहे त्यामुळे आपल्याकडील बहुतांश लोकसंख्या ग्रामीण भागात राहतात, आणि यामध्ये मोठया प्रमाणात आर्थिक दुर्बल व गरीब सामान्य नागरिक आहेत, त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्यात समाजातील निरनिराळ्या स्तरांवर आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित व निराधार नागरिक आहेत, राज्यात ग्रामीण भागात तसेच शहरी भागात मोठयाप्रमाणात कमी उत्पन्न असलेल परिवार आहेत, जे हात मजुरी करून जीवनयापन करतात, अशा बहुसंख्य कुटुंबांकडे जीवनावश्यक आणि मुलभूत वस्तूंची कमतरता असते तसेच बहुसंख्य नागरिक दारिद्र्यरेषेखाली जीवन जगतात, त्यामुळे असे परिवार त्यांच्या घरातील वृद्धांकडे दुर्लक्ष करतात त्याचप्रमाणे बहुतांश वृद्धांकडे त्यांच्या वृद्धापकाळात धनार्जनाचे साधन नसते, त्यामुळे बहुतेकवेळा कुटुंबाकडून त्यांची उपेक्षा केली जाते, त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते, त्यांचा अपमान केल्याजातो त्यामुळे अशा जेष्ठ नागरिकांना समाजात जीवन जगणे कठीण होते, अशा जेष्ठ नागरीकांना आर्थिक पाठबळ मिळावे म्हणून, त्याचप्रमाणे वृध्द नागरिकांना समाजात मानाने जीवनयापन करता यावे यासाठी महाराष्ट्र शासनाने हि श्रावण बाळ योजना राज्यात राबविली आहे. वाचक मित्रहो, या लेखामध्ये आपण श्रावण बाळ योजना 2023 संबंधित संपूर्ण माहिती पाहणार आहोत, जसे कि या योजनेचे फायदे, योजनेसाठी लागणारी पात्रता, श्रावण बाळ योजना काय आहे, महत्वाची कागदपत्रे, अर्ज पद्धती, वैशिष्टे, आणि लाभार्थ्यांची यादी इत्यादी संपूर्ण या योजनेबद्दल माहिती पाहणार.
श्रावणबाळ योजना 2023 संपूर्ण माहिती मराठी
राज्यातील 65 आणि 65 वर्षाच्या वरील जेष्ठ नागरीकांसाठी त्यांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हि श्रावण बाळ निवृत्तीवेतन योजना संपूर्ण महाराष्ट्रात सुरु केली आहे, महाराष्ट्र सरकारव्दारे नेहमीच राज्याच्या नागरिकांसाठी कल्याणकारी आणि लोक उपयोगी योजना राबविल्या जातात, या योजनांव्दारे समाजातील कमी उत्पन्न असलेले, वंचित नागरिक, आर्थिक दुर्बल घटक त्याचबरोर निराधार जेष्ठ नागरिक आणि सामान्य गरीब नागरिक यांचे जीवनमान सुधारणे त्यांना आर्थिक सुरक्षा देणे तसेच त्यांना आरोग्यविषयक सुविधा निर्माण करून देणे आणि त्यांना समाजात मानाने जीवन जगण्यास पाठबळ देणे हा उद्देश शासनाचा असतो, त्याप्रमाणे या श्रावण बाळ योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकार दरमहा 600/- रुपये जेष्ठ नागरिकांना वृद्धापकाळ निवृत्तीवेतन देत आहे. जेणेकरून वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, ज्या पात्र नागरिकांना या योजनेचा लाभ मिळवायचा आहे ते महाराष्ट्र शासनच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात, तसेच ऑफलाईन सुद्धा या योजनेमध्ये तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्याची प्रक्रिया पुढे लेखामध्ये दिली आहे.
Red more Atal Bhujal Yojana Maharashtra: अटल भुजल योजना संपूर्ण माहिती
महाराष्ट्र श्रावण बाळ योजना अंतर्गत मुख्य घटक आणि वैशिष्ट्ये [Features]
महाराष्ट्र श्रावणबाळ योजना 2023 हि योजना राज्यातील निराधार आणि वंचित वृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र आणि स्वावलंबी बनवेल, हि योजना महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक आणि विशेष साहाय्य विभागाकडून राबविली आणि नियंत्रित केली जाते, या योजनेप्रमाणेच निराधार व दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी संजय निराधार योजना आणि इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना शासनव्दारे राबविल्या जातात. श्रावण बाळ या योजनेंतर्गत लाभार्थ्यांच्या दोन श्रेण्या करण्यात आल्या आहे, श्रेणी – (अ) आणि श्रेणी- (ब), या योजनेंतर्गत 65 व 65 वर्षावरील आणि दारिद्र्य रेषेच्याखालील कुटुंबाच्या यादीत नाव समविष्ट असणाऱ्या निराधार स्त्री व पुरुष नागरिकांना श्रावणबाळ सेवा निवृत्तीवेतन योजना गट –(अ) मधून 400/- रुपये प्रतीमहिना निवृत्तीवेतन देण्यात येते आणि याच लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजनेचे 200/- प्रतिमहिना असे एकूण 600/- प्रतिमहिना प्रति लाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.
याचप्रमाणे श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट – (ब) हि योजना जे नागरिक खरोखरीच गरजू निराधार वृद्ध आहेत परंतु ज्यांची दारिद्य रेषेखालील यादी मध्ये नोंद नाहीत. तसेच या योजनेंतर्गत ज्या नागरिकांचे वय वर्षे 65 व 65 वर्षाच्या वरील आहे आणि ज्यांच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपयेच्या आत आहे अशा वृद्ध नागरिकांना श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना गट – (ब) मध्ये 600/- रुपये प्रतिमहिना प्रतीलाभार्थी निवृत्तीवेतन देण्यात येते.
Red more लेक लाडकी योजना सुरू; मुलींना 75,000 रु. मिळणार : Lek Ladki Yojana Maharashtra 2023
महाराष्ट्र श्रावण बाळ योजना उद्दिष्ट (Objectives)
श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना हि योजना महाराष्ट्र सरकारची महत्वाकांक्षी आणि मुख्य योजना आहे, या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे 65 वर्षावरील वृद्ध निराधार आणि वंचित राज्याच्या नागरिकांना आर्थिक सहाय्य आणि प्रोत्साहन देणे, त्याचबरोबर या पेन्शन योजनेचा उद्देश राज्यातील वयोवृद्ध नागरिकांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून त्यांना समाजात मानाचे जीवन देणे हा आहे, जेणेकरून वृद्धांना कुटुंबातील कोणावरही अवलंबून राहण्याची गरज नाही व त्यांना स्वावलंबीपणे जीवन जगता यावे. शासनाच्या या योजनेचा उद्देश आहे हि योजना समाजातील प्रत्येक गरजू निराधार वृद्ध नागरिकांपर्यंत पोहचवावी.
श्रावण बाळ योजना 2023 मुख्य Highlights
योजनेचे नाव श्रावण बाळ योजना
व्दारा सुरु. महाराष्ट्र शासन
राज्य महाराष्ट्र
लाभार्थी. गरीब जेष्ठ नागरिक
उद्देश्य. वृध्द नागरिकांना आर्थिक मदत
विभाग सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग
श्रावण बाळ योजना लाभार्थी पात्रता
महाराष्ट्र सरकारने श्रावण बाळ योजनेच्या पात्र लाभार्थ्यांचे (बीपीएल) यादीत समावेश असल्याच्या आधारावर दोन गटामध्ये वर्गीकरण केलेले आहे, गट अ आणि गट ब त्यामुळे लाभार्थ्यांसाठी खालीलप्रमाणे पात्रता निकष आहे.
गट (अ) :- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचे कायमचे रहिवासी असावे
योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जादारचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वर असावे
योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदाराचे नाव दारिद्य्ररेषेखालील यादीत असावे
गट (ब) :- या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायमचा रहिवासी असावा
योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदारचे वय 65 वर्ष किंवा 65 वर्षाच्या वर असावे
या योजनेंतर्गत पात्र लाभार्थी अर्जदाराच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न 21,000/- रुपये पेक्षा जास्त नसावे
या योजनेमध्ये असे पात्र अर्जदार ज्यांच्या कुटुंबाची दारिद्र्यरेषेखालील यादीत नोंद नाही
महाराष्ट्र श्रावण बाळ योजना लाभ आणि विशेषता
मुलभूत गरजांसाठी वृद्ध नागरिकांना कुटुंबावर अवलंबून राहावे लागत होते, या योजनेमुळे ते आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होतील, आणि त्यांना समाजात सन्मानाने जीवन जगता येईल.
श्रावण बाळ योजनेंतर्गत महाराष्ट्र सरकार राज्यातील निराधार आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत वृद्धांना दर महिन्याला 600/- रुपयांची आर्थिक सहायता करणार आहे.
श्रावण बाळ योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे महाराष्ट्रातील वंचित आणि कमी उत्पन्न गटातील वृद्ध नागरिक आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील.
शासनाने हि योजना निराधार वृद्ध लोकांसाठी राबविल्यामुळे राज्यातील वृद्ध नागरिक आपल्या आर्थिक समस्यांवर मात करू शकणार आहे.
महाराष्ट्र सरकारने या योजनेंतर्गत दोन श्रेणी बनविल्या आहे श्रेणी (अ) आणि श्रेणी (ब) श्रेण्यांमध्ये असे नागरिक असतील श्रेणी (अ) मध्ये ज्यांचे कुटुंब (बीपीएल) यादीत नोंदणीकृत आहे, तसेच श्रेणी (ब) मध्ये ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एकूण 21,000/- रुपयाच्या आत आहे, आणि श्रावण बाळ हि योजना महाराष्ट्रातील वृद्ध निराधार नागरिकांसाठी लागू आहे.
श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजना आवश्यक कागदपत्र
वयाचा दाखला :- ग्रामपंचायत किंवा नगरपालिका / महानगरपालिका मधून अधिकृत जन्म प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, रेशनकार्ड मध्ये अथवा निवडणूक मतदार यादीत नमूद केलेल्या वयाचा उतारा किंवा ग्रामीण / नागरी रुग्णालयाच्या अधीक्षक यांचा किंवा त्यापेक्षा वरील दर्जाच्या शासकीय वैद्यकीय अधिकाऱ्याने दिलेला वयाचा दाखला.
दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव :- दारिद्र्यरेषेखालील यादीमध्ये त्या व्यक्ती किंवा कुटुंबाचा समावेश असल्याचा अधिकृत पुरावा.
रहिवासी दाखला :- ग्रामीणभागामधील ग्रामसेवक, तलाठी, मंडळ निरीक्षक, नायब तहसीलदार किंवा तहसीलदार यांनी दिलेला रहिवासी असल्याबाबतचा दाखला.
0 टिप्पण्या