फक्त एक फोन करा अन् तात्काळ मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून मदत मिळवा; जाणून घ्या, संपूर्ण प्रक्रिया [ mukhy mantri sahayyata nidhi
मुख्य मंत्री एकनाथ शिंदे साहेब :- शिंदे सरकारनं राज्यातील गरजू नागरिकांना आजारपणातील उपचारासाठी मदत करण्यासाठी एक योजना सुरू केली आहे. त्यानुसार संपर्कासाठी 8650567567 हा नवा मोबाईल क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. या क्रमांकावर मिस्डकॉल देताच मुख्यमंत्री सहायता निधीचा अर्ज मोबाईलवर उपब्लध करून दिला जाणार आहे. ग्रामीण भागांसह राज्यातील इतर कानाकोपऱ्यांतून या सहायता निधीसाठी इच्छुक असणाऱ्या नागरिकांना या सुविधेमुळे दिलासा मिळणार आहे. तसेच, अर्ज करण्याची किचकट प्रक्रिया अत्यंत सुलभ होणार आहे.
तसेच गोर गरिबांच्या साटी ही योजना लाभदायक आहे तरी याचा लाभ घ्यावा , वैद्यकीय खर्च न परवडणाऱ्या कुटुंबासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी दिला जाणार आहे. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दुर्धर आजारांवर उपचार करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीमधून मदत जाहीर केली जाते. विविध शस्त्रक्रिया, आजारांवरील उपचारांसाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून मदत दिली जाते. यासाठीचा अर्ज कुठे मिळतो, तो कसा भरायचा किंवा तो मुख्यमंत्री कार्यालयातूनच घ्यावा का, अशा विविध शंका सर्वसामान्यांच्या मनात असतात. सर्वसामान्य नागरिकांची ही शंका दूर करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाने आता नवा उपक्रम जाहीर केला आहे. नव्या उपक्रमानुसार नागरिकांसाठी ही मिस्डकॉलची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.तरी आपण आता सविस्तर माहिती पाहूया याचे अर्ज ,कागदपत्रे आणि अंजरांची लिष्ठ पाहूया
. हे ही जाणून घ्या आभा कार्ड कडून घ्या 👇
https://storiesaboutvillage.blogspot.com/2023/07/Aabha%20Card%20-%20%20%20%20%20%202%20%20.html
माझी कन्या भाग्यश्री योजना
https://storiesaboutvillage.blogspot.com/2023/07/%20%20%20%20%20%20%20%202023%20%20.html
![]() |
मुख्यमंत्री सहाय्यता निधी |
मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी मिळणाऱ्या आजारांची नावे
1 ] विद्युत अपघात रुग्ण
2 ] अपघात
3 ] अपघात शस्त्रक्रिया
4 ] कॉकलियर इम्प्लांट ( वय वर्ष 2 ते 6)
5 ] बोन मॅरो प्रत्यारोपण
6 ] लहान बालकांचे शस्त्रक्रिया
7 ] बर्न रुग्ण
8 ] कर्करोग शस्त्रक्रिया
9 ] हृदय प्रत्यारोपण
10] गुडघ्याचे प्रत्यारोपण
11] हिप रिप्लेसमेंट
12] यकृत प्रत्यारोपण
13] डायलिसिस
14] हृदयरोग
15] फुफ्फुस प्रत्यारोपण
16] कर्करोग (केमोथेरपी/ रेडिएशन)
17] हाताचे प्रत्यारोपण
18] नवजात शिशुंचे आजार
19] किडणी प्रत्यारोपण
20] मेंदूचे आजार
मुख्यमंत्री सहाय्यता निधी साटी आवश्यक कागदपत्रे पुडीलप्रमाणे :-
1 अर्ज [ विहित नमुन्यात ]
2 रुग्णाचे आधारकार्ड [महाराष्ट्रा राज्याचे ]
3 रुग्णाचे रेशनकार्ड [ महाराष्ट्रा राज्याचे ]
3 संबधित आजारचे रिपोर्ट असणे गरजेचे आहे
4 वैद्यकीय खर्चाचे अंदाजपत्रक / प्रमाणपत्र मुळपत डॉक्टर याच्या सही व शिक्का हवा व तसेच ते खाजगी रुग्णालय असल्यास सिव्हिल सर्जन यांचेकडून प्रमाणित करणे गरजेचे आहे
5 तहसीलदार कार्यालय उत्पन्न दखला [रु 1,60 लाखपेकक्षा कमी उत्पन्न असणे गरजेचे आहे ]
6 संबंधित आजाराचे रिपोर्ट असणे आवश्यक आहे.
7 रुग्णालयाची नोंद मुख्यमंत्री सहाय्यता निधी कार्यालयाच्या संगणक प्रणालीवर असल्याची खात्री करावी.
8 अपघात असल्यास, FIR असणे आवश्यक आहे.
9 अवयव प्रत्यारोपण असल्यास रुग्णालयाचे मान्यता प्रमाणपत्र अथवा ZTCC येथे नोंदणी केल्याची पावती जोडणे आवश्यक आहे
टीप : आम्ही तुम्हाला फक्त माहिती देण्याचे काम करीत असतो पूर्ण माहिती घेण्यासाटी तुम्ही सदरच्या नेट कॅफी मध्ये जाऊन फॉर्म भरून घेणे व माहिती घेणे
धन्यवाद 👍
0 टिप्पण्या