10 दिवसांत 10 किलो वजन कमी करते Fat Diet? वेटलॉस कोचने सांगितलेला भारी उपाय एकदा ट्राय कराच..!

वजन कसे कमी करायचे : वजन कमी करण्यासाठी (Weight Loss) शारीरिक हालचालींसोबतच आहाराचाही महत्त्वाचा वाटा असतो. लठ्ठपणा कमी करण्यासाठी व्यायाम जितका महत्त्वाचा असतो, तितकाच आहार योग्य घेणेही महत्त्वाचे आहे असे तज्ज्ञांचे मत आहे. पण डाएटचा अर्थ असा नाही की तुम्ही काहीही खाण्यास सुरुवात करा आणि काहीही खाणे बंद करा.

अनेकदा असे दिसून येते की लोक खूप शारीरिक मेहनत तर करतात पण खाण्यापिण्याकडे लक्ष देत नाहीत, त्यामुळे त्यांना कोणताही फायदा मिळत नाही. Weight Loss Coach डॉ स्नेहल यांच्या मते, वजन कमी करण्यासाठी तुम्ही काय खात आहात आणि काय नाही याची काळजी घेतली पाहिजे. अन्न पूर्णपणे सोडून देणे चुकीचे आहे आणि भरपूर खाणे देखील चुकीचे आहे. खरं तर, जर तुम्हाला वजन झपाट्याने कमी करायचे असेल तर तुम्ही तुमच्या आहाराची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारचे डाएट आहेत पण तुम्हाला काय घ्यावे आणि कोणते टाळावे हे माहित असले पाहिजे.

डाएट सतत फॉलो करू नका



जर तुम्ही एखादं नवीन डाएट फॉलो करत असाल आणि तुम्हाला असे वाटत असेल की तुम्ही 30 दिवसही ते फॉलो करू शकत नाही, तर ते एक फॅड डाएट आहे. त्याऐवजी, आपण दीर्घकाळ आरामात व रोज खाऊ शकू असे विविध पदार्थ निवडा यामुळे वजन कायम नियंत्रणात ठेवण्यास मदत होते.

वाचा :- हाई बीपी : या 5 गोष्टी वाढवतात जीवघेण्या ब्लड प्रेशरचा धोका, हार्ट अटॅक येण्याआधी करा खाली दिलेले उपाय..!)

जेव्हा वजन कमी करण्याची वेळ येते तेव्हा तुम्ही नेहमी लक्षात ठेवावे की कोणताही उपाय तुमचे वजन झपाट्याने कमी करू शकत नाही. बर्‍याच वेळा असा दावा केला जातो की 10 दिवसात तुम्ही 10 किलो वजन कमी करू शकता, खरे तर अशी आश्वासने फक्त फॅड डाएटबद्दल दिली जातात. जर प्रामाणिकपणे व झटपट वजन कमी करायचे असेल तर घरचं सात्विक व हेल्दी अन्न खा, जास्तीत जास्त शारीरिक हालचाल करा.

वाचा :- व्हिटीमीन इ फूड्स : भयंकर, शरीरातील एक एक नस पोकळ व खराब करते व्हिटॅमिन ई ची कमी, ताबडतोब खायला घ्या हे 10 पदार्थ)

सर्व पदार्थ खाणं बंद करणं

आहारातून सर्व कार्बोहायड्रेट्स किंवा फॅटयुक्त पदार्थ काढून टाकणे शहाणपणाचे नाही. शरीराला त्यांची गरज असते. त्याऐवजी, तुम्हाला तुमच्या आहारातून प्रक्रिया केलेले पदार्थ काढून टाकावे लागतील. लक्षात ठेवा की तुमच्या शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी हेल्दी फॅट आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट्स आवश्यक असते.




(वाचा :- गॅस, अॅसिडिटी, पोट साफ न होणं, मुळव्याधाने केलंय जीवन हैराण? एक झटक्यात पोट साफ करून आतडी साफ ठेवतात हे 5 फूड्स)

वजन कमी करण्यासाठी प्रत्येक नियम पाळणे आवश्यक आहे, मग ते योग्य असो वा अयोग्य असे अनेकांना वाटते. हे खरे नाही हे लक्षात घ्या. बरेच लोक फॅड डाएट करून बघतात पण ते यशस्वी होत नाहीत. किटो डाएट, मिलिटरी, पॅलिओ, ऍटकिन्स हे सर्व डाएट त्यांचे योग्य नियम समजल्याशिवाय फॉलो केले तर अजिबात रिझल्ट मिळणार नाही हे कायम लक्षात ठेवा.


(वाचा :- पुरूषहो सावधान, आधी होतो डायबिटीज आणि नंतर येते नपुंसकता, ताबडतोब करा हे उपाय..!)

मग वजन कमी करण्यासाठी काय करावं?








खरं तर काही काळासाठीच किंवा काही आठवड्यांसाठी कोणत्याही

 प्रकारच्या हार्ड डाएटचे पालन करण्यात खरोखर काहीच अर्थ नाही. हे तुमचे जीवन कठीण बनवते आणि एकदा तुम्ही ते फॉलो करणे बंद केले की होतं ते वजन पुन्हा वाढते, उलट दुप्पटीने वाढते. त्याऐवजी तुमच्यासाठी सोपे, पचायला हलके आणि सोयीचे असतील असे पण हेल्दी पदार्थ खा.



टीप : हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हे कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही. अधिक माहितीसाठी नेहमी आपल्या डॉक्टरांशी संपर्क साधा.