वजन व  लठ्ठपणा दूर करण्यासाठी उपाशी राहू नका, ५ टिप्स फॉलो करून घटवा वजन



 शरीराच्या वाढत्या वजनामुळे त्रस्त आहात? जिममध्ये जाण्यासाठी वेळ नाहीय का? या लेखाद्वारे आपण काही डाएट टिप्स जाणून घेणार आहोत.

शरीराचे वाढते वजन नियंत्रणात आणण्यासाठी (Weight Loss Diet) बहुतांश लोक फिटनेस रुटीनसह (weight loss) डाएटिंग देखील करतात. पण डाएटिंग (Diet) म्हणजे दीर्घकाळ उपाशी राहून वजन कमी करण्यासाठी मदत मिळते, असे तुम्हाला वाटत असेल तर ही कल्पना अगदी चुकीची आहे. उपाशी राहण्याऐवजी पौष्टिक आहार आणि आपल्या जीवनशैलीतील सवयींमध्ये योग्य ते बदल केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते.


डाएटमध्ये कॅलरीयुक्त पदार्थांचा समावेश करणं टाळा. चरबीयुक्त पदार्थांऐवजी आहारामध्ये पौष्टिक खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास तुमच्या शरीराचे वजन नियंत्रणात येण्यास मदत मिळेल. डाएटिंग न करताच लाइफस्टाइलमध्ये छोटे-छोटे बदल केल्यासही वजन कमी होऊ शकते. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती....


(Weight Loss Story कोरफडीच्या रसाचे सेवन आणि वर्कआउट करून या महिलेनं घटवले तब्बल १२Kg वजन)

ज्युसऐवजी करा फळांचे सेवन

फळांचा रस आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे. पण अख्ख्या फळांचे सेवन केल्यास शरीरास जास्तीत जास्त लाभ मिळतात. फळांचा साखरयुक्त रस पिण्याऐवजी फळंच खाणे अधिक फायदेशीर असल्याचे तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कारण यामध्ये कॅलरीची मात्रा कमी असते आणि शरीराचे अतिरिक्त वजन सुद्धा वाढत नाही. एका अभ्यासामध्ये करण्यात आलेल्या दाव्यानुसार, फळांच्या सेवनामुळे टाइप २ मधुमेहाचा (type 2 diabetes) धोका देखील कमी होतो

​मर्यादित स्वरुपातील आहार


जीभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आपण कधी-कधी जास्त प्रमाणात खाद्यपदार्थांचे सेवन करतो. शरीराच्या आवश्यकतेपेक्षा अधिक खाल्ल्यास कॅलरी आणि अतिरिक्त वजन वाढते. याउलट मर्यादित स्वरुपात पदार्थ खाल्ले तर वजन वाढत नाही आणि शरीरातील कॅलरीची पातळी सुद्धा नियंत्रणात राहते. या सवयीचा अवलंब केल्यास आरोग्य निरोगी राहण्यास मदत मिळेल. वजन कमी करायचे असल्यास अतिरिक्त खाण्याच्या सवयीवर नियंत्रण मिळवणे अत्यंत गरजेचं आहे. कारण वाढत्या वजनामुळे अन्य शारीरिक समस्या देखील उद्भवू शकतात.

​जंक फूड वर्ज्य करा


जेवणापूर्वी किंवा टीव्ही पाहतानाही अनेकांना जंक फूड खाण्याची सवय असते. पण याद्वारे शरीरामध्ये जास्तीत जास्त कॅलरीज जात आहेत, हे लक्षात घ्या. यामुळे वजन वाढण्याची शक्यता असते. तुम्हाला देखील ही सवय आहे का? तर मग जंक फूडऐवजी पाणी प्या. पाणी प्यायल्याने तुमची भूक शांत होईल आणि शरीर देखील हायड्रेट राहील.






स्वयंपाकामध्ये दालचिनीचा करा उपयोग


‘द जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ न्युट्रिशन’ (The Journal of the American College of Nutrition) मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, खाद्यपदार्थ उदाहरणार्थ ब्रेड, धान्य आणि अन्य स्टार्चयुक्त पदार्थांमध्ये एक चमचा दालचिनी (Cinnamon) मिक्स केल्यास रक्तातील शर्करेची पातळी नियंत्रणात आणली जाऊ शकते. तसंच यामुळे वारंवार भूक लागण्याची समस्या देखील उद्भवणार नाही.