व्हेज पिझ्झा
व्हेज पिझ्झा रेसिपी मराठी :-
पिझ्झा बनवण्याची आणि खाण्याची मजा तेव्हाच येते जेव्हा पिझ्झा बेस स्वतः घरी तयार केलेला असतो. यासाठीच या पिझ्झासाठी आम्ही तुम्हाला पिझ्झा बेस तयार करण्यापासून पिझ्झा कसा करायचा हे सांगणार आहोत
साहित्य –
1) गव्हाचे आणि मैद्याचे पीठ प्रत्येकी अडीच कप
इस्ट
2) तेल दोन Once
3) चीज आवडीनुसार
4) चिरलेला टोमॅटो
5) चिरलेला कांदा
6) चिरलेली सिमला मिरची
7) चीझ
8) चवीपुरते मीठ
9) कोमट पाणी
10) इटालियन मसाला
11) अर्धा चमचा साखर
पिझ्झा बनवण्याची कृती –
1) सर्वात आधी पीठ आणि मैदा चाळून घ्या. त्यात बटर अथवा तेल, मीठ. इटालिअन मसाला टाका आणि चांगले मिक्स करा.
2) कणकेच्या मध्यभागी खड्डा करून त्यात साखर आणि कोमट पाण्यात इस्ट अॅक्टिव्हेट करा. यीस्ट अॅक्टिव्हेट झाल्यावर पीठ मऊसर मळून घ्यावे. पीठाला लवचिकता येईल इतपत ते मळून घ्या. पीठाच्या गोळ्याला तेल लावून ते एका भांड्यात वरून ओला फडका ठेवून पाच ते सहा मिनीटे ठेवा. उबदार ठिकाणी ठेवल्यास पीठ लवकर फुगेल.
3) ओव्हन प्रीहिट करून घ्या आणि पिझ्झा बेक करण्यासाठी ट्रे तयार करा
4) ट्रेला ऑयलिंग आणि डस्टिंग करून घ्या
5) मळलेल्या पीठाला बेसप्रमाणे आकार द्या आणि तो ट्रेमध्ये ठेवा वरून काट्याने टोचे मारा.
6) साधारपणे २५० सेल्सिअसवर सहा ते सात मिनिटे पिझ्झा बेस बेक करा
7)बेक केलेल्या बेसवर बटर, सॉस, टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मीठ, चिली फ्लेक्स टाका आणि पिझ्झा आणखी पाच मिनीटे बेक करा.
टीप :- नमस्कार मित्र मैत्रिणी नो ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या या वेबसाईटवर ला follow करा कमेन्ट करा आणि काही बदल हवा असले तरी सांगा
0 टिप्पण्या